टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आपणांस शुभेच्छा!
शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी तसेच इंग्रजी, गणित,
विज्ञान इ. विषयांच्या अभ्यासाचा त्यांचा पाया पक्का व्हावा या हेतूने दरवर्षी इंग्रजी, गणित,
संस्कृत, मराठी भाषा इ. विषयांच्या परीक्षा वर्षातून फेब्रुवारी/सप्टेंबर या महिन्यात
विद्यापीठांतर्गत विद्या प्रसारक मंडळ स्थापन करून परीक्षांचे नियोजन केले जाते. या
परीक्षांचा अभ्यासक्रम शासनाने तयार केलेल्या शालेय अभ्यासक्रमास उपयुक्त व पूरक
असल्याने या परीक्षांचा अभ्यासक्रम शासनाने तयार केलेल्या शालेय अभ्यासक्रमास उपयुक्त व पूरक
असल्याने या परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाल्या.तसेच शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत
आलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या परीक्षांचा उपयोग शालांत परीक्षेच्या तयारीसाठी
झाल्याचे अभिमानाने आवर्जुन नमूद केलेले आहे. गेली अनेकवर्षे शालेय विद्यार्थ्यांची
गुणवत्ता वाढविण्याचे काम या परीक्षांच्या माध्यमातून विद्यापीठ करीत आहे.सर्व विषयांच्या प्रत्येक परीक्षेस प्रथम
क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यास मार्गदर्शन करणाऱ्या विषय शिक्षकांना विशेष प्रमाणपत्र
देऊन गौरविण्यात येते.
लोकमान्य बाळ गंगाधर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वक्तृत्वत्तेजक सभा व टिळक
स्मारक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा
आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मा.
कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली. २००५-२००६
पासून सुरू केलेला उपक्रम दरवर्षीप्रमाणे लोकमान्य पुण्यतिथीला वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाते.